Gargis Fun World

About Us


गार्गीचे गंमत विश्व म्हणजे प्रत्येक शिशु / बालकासाठी स्वतंत्र्य मोकळी बागचं ! कारण माझे असे मानने आहे की, प्रत्येक बालक / मूल हे विशेष असून प्रत्येक मूल हे वेगळे आहे. अनेक संशोधन असे म्हणतात की, नवीन पिढीतील मुलांमधे विचारशक्ती फार प्रगत आहे.
आम्ही प्रत्यक्ष मुलांना खेळण्यासाठी उत्तेजन देतो, शैक्षणिक खेळण्याचा उपयोग करून कौशल्य वाढवण्यासाठी प्रोत्साहित करतो. शिकाऊ मुलांचे मन हे नव-नवीन गोष्टी समजून त्या स्मरणात ठेवते. त्यांची स्मृती ही स्पंजासारखी असते. त्यांना योग्य गोष्ट, योग्य पध्दतीने शिकवणे अत्यावश्यक असते. हि गोष्ट ध्यानात ठेवून,  मुलांच्या निर्मितिक्षमतेचा विकासकरण्यासाठीआम्ही मुलांना रंगकागद, crayons, फ़्लैशकार्ड, ज्ञानेंद्रियांचा - स्मृतीचा खेळ, शिल्पकला, कागद कापणे (वयोमानानुसार) ह्या गोष्टी शिकवतो.
शिवाय बरोबरीने नृत्य, कसरत / व्यायाम, इंग्रजी, मराठी, हिन्दी भाषेतील कवितांचे पाठांतर ह्या गोष्टी ही नियमितपणे   आयोजित करतो. आमचा आपल्या समृद्ध परंपरांवरविश्वास आहे आणि आम्ही त्यांचा आदर करतो.
म्हणूनच दररोज प्रार्थना आणि श्लोक कथन व पाठांतर केले जाते. त्याद्वारे आपले जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत चांगला समाज निर्माण व्हावा व पर्यायाने एक सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा या मागील प्रमुख उद्देश आहे.
त्याशिवाय आम्ही प्रत्यक्ष मुलांना वृक्षारोपणकर णे, रोपांची लागवड करणे, बी रूजविणे, झाडांना पाणी देणे, रोपांची माहिती, ओळख करून देणे, अशा गोष्टीही शिकवतो.
त्याचप्रमाणे आम्ही मुलांना सर्वोत्कृष्ट दर्जाचा पोषक आहार देतो कारण "स्वस्थ आणि  निरोगी शरीर हिच खरी मालमत्ता होय."